¡Sorpréndeme!

वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर | Bhide Guruji | Sakal Media |

2021-07-05 1,353 Dailymotion

वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर
कऱ्हाड (सातारा) : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे. वारकऱ्यांवरील झालेला अन्याय योग्य नसल्याची समाजभावना आहे. त्याच भावनेतून शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे गुरूजी येथे भेटीस आले आहेत. त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही, अशी माहिती वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिली. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या संभाजी भिडे यांनी आज बंडातात्या कऱ्हाडकर यांची करवडी येथे जावून भेट घेतली. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#BandatatyaKaradkar #Karad #Warkari #BhideGuruji #Dehu